वाढत चाललेल्या प्रदुषणांमुळे दिल्लीतील सर्व शाळा रविवारपर्यंत बंद राहणार आहेत असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी बुधवारी सांगितले. लहान मुलांच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यानी मंगळवारी संध्याकाळी दिले होते. राजधानी दिल्ली ही एकप्रकारचे ''गॅस चेम्बर'' झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ''दिल्लीतील हवामानाची खालावत चाललेली परिस्थिती लक्षात घेता मुलांच्या आरोग्याबाबत कुठलीही तडजोड करता येणे शक्य नाही हे लक्षात घेऊन, आम्ही रविवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.'' अशा आशयाचे ट्विट मनिष सिसोदिया यांनी केले आहे. दिल्लीतील डॅाक्टर्सना सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करावी असे आवाहन केले आहे. अमेरिकी दुतवासाच्या संकेतस्थळावर राजधानीतील हवामानाची 2.5 सुक्ष्म केंद्र नोंद केली आहे, जे आरोग्यासाठी खुप हानीकारक असतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews